प्रो. रश्मि दीवान या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था, नवी दिल्ली, भारत येथे प्राध्यापक असून NCSL या विभागाच्या प्रमुख आहेत. गत 30 वर्षापासून त्यांचे संशोधन कार्य मुख्यत्वे शालेय शिक्षणातील गंभीर समस्या, शालेय व्यवस्थापन आणि शालेय नेतृत्व इत्यादी बाबींवर केंद्रित आहे. प्रायोगिक संशोधनाच्या मजबूत आधाराने त्या वर्तमान आणि भविष्यकालीन शैक्षणिक प्रशासक आणि शालेय नेतृत्वाच्या क्षमता बांधणीकरिता सातत्याने योगदान देत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित केलेले त्यांचे कार्य, शालेय व्यवस्थापन आणि नेतृत्व क्षेत्रामधील गतिमान शालेय नेतृत्व, शाळाधारित सुधारणेसाठी योजनाबद्ध नेतृत्व, शालेय सुधारणेकरिता नेतृत्व विकास, नेतृत्वासाठी एक उत्प्रेरक म्हणून शाळा, शाळाप्रमुखामध्ये सुधारणा, शाळेच्या प्रमुखांमधील वर्तन आणि मूल्य , RTE च्या दृष्टीने शालेय नेतृत्व कायदा 2009, बदल आणि आव्हानांचे मोजमाप, नेतृत्व स्थितीमध्ये महिलांसाठी धोरणात्मक दिशानिर्देश, छोट्या बहुवर्ग शाळांचे व्यवस्थापन आणि नेतृत्व, शाळा आधारित व्यवस्थापन आणि पर्यवेक्षण, समाज सहभाग आणि प्राथमिक शिक्षणाचे सशक्तीकरण अध्ययन संस्था म्हणून शालेय बढतीमध्ये लवचिकता या विविध क्षेत्रात त्यांचे योगदान आहे.

डॉ. सुनीता चुघ यांनी त्यांचे एम.ए. आणि एम फील (आंतरराष्ट्रीय राजकारण) JNU मधून आणि पी.एच.डी. शिक्षणशास्त्र विषयात जामीया-मीलीया इस्लामिक विद्यापीठातून केली आहे. सध्या त्या NCSL, NIEPA येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करित आहे. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शहरी वंचित मुलांचे शिक्षण, समावेशीत शिक्षण, आरटीई आणि त्यांची अंमलबजावणी आणि शाळा नेतृत्व यांचा समावेश आहे. त्यांनी प्रसिध्द जर्नल्समध्ये लेखन केलेले आहे आणि शैक्षणिक दर्जा, झोपडपट्टीत राहणार्‍या मुलांच्या समस्यांवर एक पुस्तक लेखन केले आहे. शहरी मागासलेल्या मुलांचा प्रवेश, सहभाग आणि शिकण्याच्या उपलब्धतेवर त्यांनी संशोधन प्रकल्प केले आहे आणि जेरुसलेम येथे समावेशीत शिक्षण कार्यक्रमात व नॉटींगहॅम येथे शालेय नेतृत्व कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. त्या शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रम सक्रीयपणे दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि मिझोरम येथे राबवित आहेत.
ईमेल आई डी: sunitachugh[at]niepa[dot]ac[dot]in

डॉ. कश्यपी अवस्थी ह्या NIEPA मधील राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) मध्ये असीस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांचा सध्याचं कार्यक्षेत्र हे शालेय नेतृत्व विकसन असून तिथे त्या त्यांच्या टिमसोबत अभ्यासक्रम आणि हस्तपुस्तिका विकसन कार्यामध्ये सक्रीय आहेत. त्या एम फील च्या विद्यार्थ्यांना संशोधन या विषयाचे अध्यापन व मार्गदर्शन करतात. यापूर्वी त्यांनी शिक्षण विभाग (CASE,) गुजरांत विद्यापीठातील बडोदा विद्यापीठातून प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तेथून त्यांनी पीएचडी घेतली. त्यांनी प्राथमिक शिक्षणातील ‘समाजातील सहभाग’ आणि प्राथमिक शिक्षणातील ‘शिक्षकांची क्षमता बांधणी’ या क्षेत्रात योगदान दिले आहे. त्या सध्या गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार द्विपसमुह इत्यादी ठिकाणी त्यांच्या सध्याच्या कामाचा भाग म्हणून शालेय प्रमुखांचे आणि स्त्रोत गटांच्या क्षमता बांधणी कार्य करण्यात व्यस्त आहे
ईमेल आई डी: kashyapiawasthi[at]gmail[dot]com

डॉ. सुबिथा जी.वी. मेनन यांनी प्रादेशिक शिक्षण संस्था, म्हैसूर येथून शिक्षणशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली. त्यांनी शैक्षणिक मानसशास्त्रातील निर्देशित डिझायनिंग आणि मोड्यूल विकसन क्षेत्रात लक्षणीय कार्य केलेले आहे. त्यांनी इ-लर्निंग क्षेत्रात संगणक आधारित प्रशिक्षण मोड्यूल विकसित करणार्‍या निर्देशक डिझायनर म्हणून काम केले. तिने आय. आय. टी. मद्रासच्या प्रकल्पांवर काम केले आहे. ज्यामध्ये SSAचे सनियंत्रण, तसेच तामिळनाडूच्या सरकारी शाळांमध्ये ALM ची अंमलबजावणी आणि मूल्यांकन करणे समाविष्ट आहे. त्या सध्या NIEPA मध्ये NCSL साठी असिसस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. आसाम, कर्नाटक, तेलंगाना, ओडीसा आणि पुडुचेरी येथे NCSL शालेय नेतृत्व कार्यक्रमाचे समन्वयन करित आहे

ईमेल आई डी: subithagvmenon[at]gmail[dot]com

डॉ. एन.मैथिली सध्या NIEPA मध्ये NCSL ला असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या आवडीचे कार्यक्षेत्र म्हणजे शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन वर आधारित शिक्षण कार्यक्रमाची रचना आणि नियोजन, शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन कार्यक्रमाची काही राज्यात अंमलबजावणी करुन क्षमता बांधणी करणे आणि शालेय नेतृत्वातील स्त्री यावर संशोधन. त्यांनी कर्नाटकमधील विशेष संदर्भासह ग्रामीण शासकीय शाळांतील गुणवत्ता शिक्षणावर कार्य केलेले आहे. 12 व्या पंचवार्षिक योजनेत शिक्षकांच्या शिक्षणाची पुर्नरचना करण्यासाठी विशेष संदर्भ देऊन त्यांनी शालेय शिक्षण व्यवस्थेतील शैक्षणिक संरचना क्षेत्रात संशोधन केले आहे. त्यापूर्वी बंगलोरच्या सामाजिक व आर्थिक बदलांसाठी संस्थांशी संबंधित होत्या. सेंटर फॉर मल्टी डिसप्लिनरी डेव्हलपमेंट रिसर्च, धारवाड, अझीम प्रेमजी फाऊंडेशन (बंगलोर) टी. आय. एस. एस. (मुंबई), संदर्भिय जर्नलसमध्ये त्यांचे अनेक संशोधने प्रकाशित आहेत. आंध्रप्रदेश, केरळ, मेघालय, मणिपूर आणि सिक्कीम येथे शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमाचे नेतृत्व करित आहे.
ईमेल आई डी: sastry.mythili18[at]gmail[dot]com

डॉ. चारू स्मिता मलिक - सध्या या NIEPA, मध्ये NCSL ला जेष्ठ सल्लागार (Senior Consultant) म्हणून कार्यरत आहे. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था नवी दिल्ली येथून शैक्षणिक धोरण, नियोजन आणि प्रशासन यात पीएचडी प्राप्त केली आहे. उत्तर प्रदेशातील माध्यमिक पातळीवरील प्रवेश आणि समता या मुद्यांवर आधारित त्यांचे संशोधन कार्य आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात पदव्यूत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. त्या शालेय नेतृत्व कार्यक्रम रचना व विकसन कार्यात आपल्या टिम सोबत कार्यरत आहे आणि शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन मध्ये प्रमाणपत्र आणि पद्‌व्युत्तर पदविका कार्यक्रमात अध्यापन करण्यात सहभागी आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हरियाना, महाराष्ट्र आणि अगदीच अलीकडे जम्मू-कश्मीर आणि झारखंडमधील शालेय नेतृत्व कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सक्रीय कार्य करीत आहे. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक नेतृत्व आणि शैक्षणिक नियोजन इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो.
ईमेल आई डी: charunuepa[at]gmail[dot]com .


श्री सूरज कुमार
सॉफ्टवेयर डेवेलपर

डॉ. तनुश्री महालिक

सुश्री मोनिका बजाज
सुश्री दिव्या ज्योति
सुश्री गुरमीत कौर
प्रशासनिक सलाहकार

सुश्री अल्का नेगी

श्री राम पुकार सिंह