राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) बद्दल थोडक्यातर

सन 2012 मध्ये NIEPA येथे स्थापन झालेली राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) ही देशातील शाळांच्या परिवर्तनासाठी समर्पित आहे. शालेय परिवर्तन हे मुख्य उद्दिष्ट ठेऊन NCSL - NIEPA 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 679 जिल्हे आणि देशभरातील 6500 तालुक्यांमध्ये नेतृत्वाची आवश्यकता आणि संबंधित शालेय समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यरत आहे. केंद्रशासनाच्या सर्व कृती प्रत्येक राज्य/ केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक शाळेसाठी एक परिवर्तनात्मक अजेंडा संक्रमित करण्यावर लक्ष केंद्रित करतात. विभिन्न परिस्थितीत कार्य करणारे नेतृत्व मॉडेल विकसित करण्यासाठी केंद्र कार्यरत आहे.

देशातील प्रत्येक शाळेत पोहचणे, प्रत्येक मुलांच्या शिकण्याची हमी आणि प्रत्येक शाळेची उत्कृष्ठता सुनिश्चित करणे ही केंद्राची मुख्य उद्दीष्टये आहे. या अभियानाच्या साध्यतेसाठी केंद्राने चार घटकांसह कार्यरत कृतींद्वारे शालेय नेतृत्व विकास संकल्पित केलेला आहे. हे चार घटक म्हणजे अभ्यासक्रम आणि साहित्य विकसन, क्षमता बांधणी, नेटवर्कींग आणि संस्थात्मक बांधणी तसेच संशोधन व विकास होय.

शालेय नेतृत्वावरील नेहमीच्या अल्पमुदतीच्या कार्यक्रमांप्रमाणे केंद्राने नेतृत्व विकासाच्या कृती तयार केलेल्या आहेत. जे शाळाप्रमुखांच्या आणि सुयोग्य प्रशासकांचा सातत्यपूर्ण सहभाग आणि दिर्घकालीन विकासाची हमी देतात. भारतात प्रथमतःच शालेय नेतृत्व विकसनावर राष्ट्रीय कार्यक्रम रूपरेषा आणि अभ्यासक्रम आराखडा राष्ट्रीय स्तरावर संकल्पित केलेला आहे. संपूर्ण कार्यक्रम अध्ययनार्थी केंद्रित अभ्यासक्रमावर आधारित आहे. जो गरजा आणि राज्यातील शाळांच्या प्रासंगिक समस्यामधून आणि त्यामधील विविधतेवर आधारलेला आहे. अभ्यासक्रम आराखड्यामध्ये शालेय नेतृत्व विकसनावर हस्तपुस्तिका निर्मिती केलेली आहे, जी एक समृध्द स्त्रोत आणि संदर्भ साहित्य म्हणून निर्माण केलेली असून ती आजच्या शाळाप्रमुखांना शाळा बदलण्यासाठी, अस्तित्वात असलेल्या शाळांना सुसज्ज करण्यासाठी तयार केलेली आहे. भविष्यातील आव्हाने पूर्ण करण्यासाठी उत्तराधिकारी म्हणून भावी नेत्यांना सक्षम करण्यासाठी तयार केलेली आहे.