आपल्या स्थापनेच्या दिवसापासूनच, राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) येथील राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) ने स्वतःला शाळाप्रमुखांच्या नेतृत्वाची क्षमता निर्माण करण्यास, ‘ही माझी बलस्थाने आहेत’, ‘ही माझी शाळा आहे’, आणि माझी शाळा बदलण्यास आणि परिवर्तन करण्यास काय करावे असा विश्वास निर्माण करण्यासाठी स्वतःला समर्पित केलेले आहे. आज आपण एका स्थितीत पोहोचलो आहे, जेथे आपण अभिमानाने घोषित करु शकतो की राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (NIEPA) द्वारे संकल्पित शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रम संपूर्ण देशभर लागू केला जातो. या प्रयत्नात आपली राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सरकारांच्या सहयोगी प्रयत्नांचे कौतुक केले जाते. आमच्या राज्य संसाधन गटातील सदस्य आणि शाळा प्रमुख जे आमच्या शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमांशी अगदी जवळून संबंधित आहे त्यांनी या कार्यक्रमांबाबत दाखविलेला उत्साह हा अद्वितीय आहे.

राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्रा (NCSL) ने सुरु केलेल्या शाळा नेतृत्व विकास कार्यक्रमावरील अनेक कार्यक्रमांपैकी शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनावरील हा एक प्रकारचा ऑनलाईन कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर संकल्पित केलेल्या शालेय नेतृत्व विकसन अभ्यासक्रमाच्या आराखड्यावर आधारित आहे. हा कार्यक्रम वास्तविक शालेय संदर्भिय बाबींवर आधारित असून अधिक संदर्भिय नेतृत्व समस्यांशी निगडित आहे. हा कार्यक्रम मुख्यतः बदल आणि सुधारणांसाठी मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या मुख्य भूमिकेत मध्यवर्ती स्तरावर आणणारी व्यवहार केंद्रित दृष्टीकोनातून अनुसरण करते. म्हणूनच हे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या प्रमुख आणि प्राचार्यांसाठी आहे. शाळा आधारित बदल आणि नवोपक्रम सुरु करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी हा कार्यक्रम विपुल प्रमाणात पुढाकार घेतो.

राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्राने (NCSL) मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या(MHRD) आदेशानुसार MOODLE प्लॅटफॉर्मचा वापर करुन ऑनलाईन कार्यक्रमाच्या अविश्वसनीय जगामध्ये प्रवेश करण्याचे आव्हान स्विकारले. ‘होय आम्ही हे करु शकतो’, असा आत्मविश्र्वास वाढविण्यासाठी आम्ही MHRD चे आभारी आहोत. NCSL च्या प्रत्येक सदस्याने त्यानंतर या कार्यक्रमाचा भाग म्हणून ई-सामग्री तयार करणे, संकलन करणे, रचना करणे, संदर्भ वाचन साहित्य आणि सराव, स्वाध्याय, मूल्यमापन, ऑडीओ, व्हीडीओ लिंक इत्यादी निर्माण करण्यासाठी अविरत काम केले आहे. मी NCSL,NIEPA आणि आमच्या विद्यापीठातील तांत्रिक तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो की, ज्यांनी आमचे कुलगुरु प्रा. एन. व्ही. वर्गीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम स्वप्नातून सत्यात उतरविण्यात सहाय्य केले.

अंतिम मैलापर्यंत पोहचण्याकरिता शाळा प्रमुखांना मदत करण्यासाठी NCSL, NIEPA राज्यसरकार/ केंद्रशासीत प्रदेशातील सरकार आणि राज्य संसाधन गटांच्या द्वारे सहकार्याची अपेक्षा करते. देशातील प्रत्येक शाळाप्रमुख या सुविचारित कार्यक्रमांमधून जास्तीत जास्त लाभ मिळवतील व शालेय बदल आणि विकासाचे उत्प्रेरक बनतील अशी मी शुभेच्छा देतो.

‘प्रत्येक मूल शिकतं करणे आणि प्रत्येक शाळा उत्कृष्ठतेत येण्याची खात्री देण्यासाठी शालेय परिवर्तनाच्या प्रवासात एकत्र सामील होऊ या'.

"हर बच्चा सीखे, हर विद्यालय उत्कृष्ट हो" |

प्रोफेसर रश्मी दिवान