शालेय नेतृत्व आणि
व्यवस्थापन या ऑनलाईन कार्यक्रमात आपले स्वागत !
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन या ऑनलाईन कार्यक्रमात (Online Programme on School Leadership and
Management) आपले स्वागत आहे. येथे आपण शालेय सुधारणा आणि परिवर्तनासाठी अध्ययन आणि
सहयोगाकरिता प्रयत्न करित आहोत.
या कार्यक्रमाशी संबधित आपल्याला माहित असलेल्या
WHO (कोण) - हा कार्यक्रम कोणासाठी आहे? देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुखांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात.
WHY (का)- हा कार्यक्रम का तयार करण्यात आलेला आहे? शाळाप्रमुख हा बदलासाठी पुढाकार घेणारा व सक्षम परिवर्तनासाठीचा मुख्य घटक असतो. हा कार्यक्रम सामान्य शाळांना ‘उत्कृष्टता केंद्रा’ मध्ये रुपांतरित करुन शालेय परिवर्तनासाठी कृतीशील व्यवस्था सुरु करण्याच्या प्रशासकीय व व्यवस्थापकीय जबाबदार्या तसेच अंमलबजावणी यासाठी शाळाप्रमुखांच्या भूमिकेत बदलाची मागणी करतो. या बदलासाठी शालेय प्रमुखाची क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. ही क्षमता बांधणी एकवेळ प्रशिक्षण घेण्याच्या पारंपारिक मॉडेलद्वारे नव्हे तर दिर्घकालीन विकासाच्या यंत्रणेद्वारे शाळाप्रमुखांना शाळांमधील वास्तविक जीवनातील आव्हानांवर मात करण्यास मदत करतात. या दृष्टिने शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम (School Leadership Development Programme) शालेय शिक्षणातील सर्व स्तरातील शाळाप्रमुखांची दिर्घकालीन व सातत्याने क्षमता बांधणी करण्यासाठी संपूर्ण देशभर सुरु केला जात आहे. राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (National Centre for School Leadership) यांनी संबधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील राज्य संसाधन समूहामार्फत आपली उपस्थिती नोंदविली आहे, ज्यांनी शाळा प्रमुखाची क्षमता वाढविलेली आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगाशिवाय प्रत्येक शाळा प्रमुखांपर्यंत प्रत्यक्ष पोहचणे अवघड असल्याचे जाणवल्यामुळे या कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन कार्यक्रम (PSLM) ऑनलाईन स्वरुपात MOODLE प्लॅटफॉर्म द्वारे सर्व शाळाप्रमुखांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
WHAT(काय)- या कार्यक्रमाचा आशय काय आहे? शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम हा राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्राने (NCSL) संकल्पित केलेल्या शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित आहे. अभ्यासक्रमात सात मुख्य क्षेत्रे आहेत. शाळा प्रमुखांच्या सर्व भूमिका आणि जबाबदार्या समाविष्ट होतील अशा सात कोर्समध्ये ते रुपांतरित केलेले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शालेय नेतृत्व दृष्टिकोना ने करून त्यानंतर
‘स्व’ चा विकास (Leading Self),
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत परिवर्तन(Transformation in Teaching Learning Process),
संघबांधणी आणि नेतृत्व (Building and Leading Teams),
नवोपक्रमाचे नेतृत्व (Leading Innovations),
भागीदारीचे नेतृत्व (Leading Partnerships), आणि
शालेय प्रशासनाचे नेतृत्व (Leading School Administration)
या क्षेत्रांचा समावेश यात केलेला आहे. शेवटचा कोर्स शाळाप्रमुखांना अध्ययनाचे संकलन आणि शाळा विकास आराखडा तयार करण्यास मदत करतो.हा संपूर्ण कार्यक्रम मुलभूत, मध्यम आणि प्रगत अशा तीन स्तरांवर विभाजित केलेला आहे. सदर कार्यक्रम हा मूलभूत स्तरावरचा आहे. राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) लवकरच त्यांच्या पोर्टलवर मध्यम आणि प्रगत स्तरावरील कार्यक्रम उपलब्ध करुन देईल. ऑनलाईन कार्यक्रमातील प्रत्येक स्तराचे साहित्य हे ई-सामग्री, स्वयंअध्ययन साहित्य, संदर्भ वाचनसाहित्य आणि मूल्यमापन या चार स्तरांमध्ये विभाजित केलेले आहे. प्रत्येक स्तर शाळाप्रमुखांना शालेय परिवर्तन आणि नेतृत्वाकरिता आवश्यक ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन विकसित करण्याकरिता सक्षम करेल असा विश्र्वास आहे. पुढील व्हिडीओ या पैलूंबाबत सविस्तर माहिती देतो जसे की मुख्य क्षेत्रे, सहभागीत्वाची पध्दत, मूल्यांकन आणि ज्ञानाचे आदानप्रदान व नेटवर्कींगसाठी पर्याय.
HOW (कसे)- तुम्ही या कार्यक्रमात प्रवेश कसा घ्याल? हा मोफत ऑनलाईन कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.तुमचा प्रवास हा कोर्स पूर्ण झाल्यावर संपत नाही, तर आपल्या शाळेच्या परिवर्तनाच्या उद्देशाने छोट्या छोट्या बदलांची सुरुवात करुन सुरु होतो. एवढेच नव्हे तर आपण आपले अनुभव NCSL, आमचे फेसबुक पेज NCSL NIEPA किंवा आमचा मेल आयडी ncsl[at]niepa[dot]ac[dot]in वर कथन करणे अपेक्षित आहे. हे आपणा सर्वांना व्यावसायिक अध्ययन समुदायाचे (Professional Learning Community) सदस्य म्हणून जोडेल आणि त्यामुळे एकमेकांच्या अनुभवांचा आणि अध्ययनाचा सातत्याने फायदा होईल.
Apply for Registation या लिंकवर कोर्स नोंदणी कशी करावी याकरिता व्हिडीओ देण्यात आला आहे. अशाप्रकारे भारतातील शाळांमधील शालेय गुणवत्ता सुधारण्याकरिता जोडणी, सहकार्य, योगदान आणि वचनबध्दता हे या शिक्षण प्रवासाचे मुख्य केंद्रबिंदू आहेत.