Dr_NV_Varghese

शालेय सुविधा प्रदान करणे, प्रवेश वाढविणे आणि शाळामध्ये मुलांची टिकवणूक वाढविणे या करिता भारताने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहे. तथापि या प्रयत्नांचे रुपांतरण अध्ययन निष्पत्तीमधील सुधारणांमध्ये झालेले नाही. विद्यार्थी अध्ययनामध्येही अधिक असमानता अस्तित्वात आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचे लक्ष्य शाळांमधून शिकण्याच्या प्राथमिकतेकडे वळत आहे. असे निदर्शनास आले आहे की, समान संसाधने असलेली शाळा भिन्न- भिन्न अध्ययन निष्पत्ती दर्शवतात. निम्नस्तरीय अध्ययन निष्पत्ती आणि खालावलेल्या शालेय गुणवत्तेबाबत प्रभावी शालेय व्यवस्थापनाची उणीव भासत आहे.

प्रभावी शालेय नेतृत्व हे संसाधन वापराच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते, अध्यापन दर्जामध्ये सुधारणा करते, अध्ययनार्थीच्या संपादणूकीमध्ये वाढ करते. उदाहरणार्थ MHRD, NIEPA ने राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र स्थापन केले आहे. ज्याचे मुख्य उद्दिष्ट प्रत्येक शाळेची उत्कृष्ठता आणि प्रत्येक मूल शिकणे आहे. भारतातील शालेय नेतृत्वाची नवीन पिढी विकसित होण्याकरिता केंद्राने शालेय नेतृत्व विकसन (SLDP) आराखडा आणि कार्यक्रमाची रचना केलेली आहे. शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम हा शाळाप्रमुखांना त्यांच्या शाळेचे उत्कृष्टततेच्या केंद्रामध्ये रुपांतरण करण्यास मदत करेल असा अंदाज आहे.

पाच वर्षाच्या अल्प कालावधित केंद्राने विशेषतः शालेय शिक्षणातील सर्व स्तरातील शाळा प्रमुखांना लक्ष्य केंद्रित करुन फेस टू फेस SLDP कार्यक्रम विकसित केला आहे. देशातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहचण्यासाठी शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनावर ऑनलाईन कार्यक्रम विकसित करण्यात केंद्र यशस्वी झाले आहे. ऑनलाईन कार्यक्रम MOODLE प्लॅटफॉर्मद्वारे कार्यरत आहे आणि केंद्राने संकल्पीत केलेल्या शालेय नेतृत्व विकसनाच्या अभ्यासक्रम आराखड्यावर त्याची रचना केलेली आहे. अभ्यासक्रम हा चार भागात विभाजित केलेला आहे.

  1. वाचन साहित्य किंवा मोड्यूल च्या स्वरुपात ई-साहित्य.
  2. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, केस स्टडी, ऑडिओ आणि इतर स्त्रोतांच्या स्वरुपात संदर्भ वाचन साहित्य.
  3. सराव अभ्यास आणि कृतींसह स्वयंअध्ययन साहित्य.
  4. बहुपर्यायी प्रश्न, स्वाध्याय, सराव, चर्चा मंच आणि संचयीकासह मूल्यांकन.

संस्थात्मक कामगिरी सुधारण्याच्या व शाश्वत विकास ध्येयाच्या आराखड्यात शाळांना अध्ययन आणि उत्कृष्टतेच्या केंद्रात रुपांतरीत करण्यासाठी शाळाप्रमुखांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) ने परिणामकारक शालेय नेतृत्व विकास कार्यक्रम विकसनाकरिता आणि त्यांच्या डिजिटल पुढाकारासाठी घेतलेल्या प्रयत्नांकरिता मी त्यांचे अभिनंदन करतो.

डॉ. एन. व्ही. व्हर्गीस